एलएसीवर तिबेटी लोकांची नियुक्ती, काय आहे चीनची खेळी?

भारत आणि चीन दरम्यानच्या वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) तैनात सैन्याला पाठबळ देण्यासाठी चीनने आता तिबेटी युवकांना सैन्यात भरती होणे अनिवार्य केले आहे. अलिकडेच १०० तिबेटी युवकांची एक तुकडी सिक्कीम जवळच्या चुंभी घाटीत तैनात करण्यात आली आहे. भारताविरोधात विशेष मोहीम आखण्याच्या दृष्टीने चिनी सैन्याकडून तिबेटी युवकांना सातत्याने प्रशिक्षण दिले जात आहे. या युवावर्गाची चीनच्याप्रती असणारी निष्ठा वारंवार तपासून आणि पारखून घेतल्यानंतरच त्यांची सैन्यात भरती केली जाते, असं सूत्रांकडून सांगण्यात येतं. चीनच्या या नव्या खेळीमागची गणितं आणि त्याचा भारतावर पडणारा प्रभाव याचं विश्लेषण केलं आहे, भारतशक्ती मराठीचे संस्थापक आणि मुख्य संपादक नितीन अ. गोखले यांनी.

नितीन अ. गोखले
मुख्य संपादक, भारतशक्ती मराठी