श्रीलंका आर्थिक संकटात : भारताकडून मदतीचा हात तर चीनचा धूर्तपणा

वांशिक हिंसाचारात होरपळलेली श्रीलंका आता एका नव्या संकटाला तोंड देत आहे. साधारणपणे 1983मध्ये सुरू झालेल्या हा वांशिक हिंसाचार 2009पर्यंत सुरू होता. त्यातून बाहेर पडत पुन्हा उभारी घेत असताना श्रीलंका आर्थिक गर्तेत सापडली आहे. महागाईने विक्राळ रूप धारण केल्याने जनतेत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशा परिस्थितीत भारताने शेजारधर्माचे पालन करत मदत पाठविण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे, चीनने या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

विदेशी चलनाची गंगाजळी मोठ्या प्रमाणावर आटल्याने श्रीलंकेची स्थिती बिकट झाली. त्यातच कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमंडली. श्रीलंकन चलनाचे अवमूल्यन झाले असून डिझेल-पेट्रोल यासारख्या इंधनाचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. तिथे खाद्यपदार्थ आणि अन्य वस्तूंचा पुरवठा ही रोडावला असून महागाई टिपेला गेली आहे. महागाई जवळपास तिपटीने वाढली आहे. जिथे जेवणासाठी भारतीय चलनात साधारणपणे 100 रुपये खर्च येत होता, तो आता हजाराच्या घरात गेला आहे.

श्रीलंकेकडे विदेशी चलनाची गंगाजळी सुरुवातीपासूनच फारशी नव्हती. 2010मध्ये श्रीलंकेकडे 7.02 अब्ज डॉलर्स होते. त्यातूनच आयातीसाठी खर्च केला. 2019मध्ये विदेशी गंगाजळी 6.2 अब्ज डॉलर्सवर आली. 2015मध्ये सत्तेवर आलेल्या नव्या सरकारने विदेशातून कर्ज घेतले. हे 13 अब्ज डॉलर्सचे अतिरिक्त कर्ज होते. त्याचा भार विदेशी गंगाजळीवर पडला. त्यामुळे त्यात भर पडण्याऐवजी ती आटू लागली.

त्यात कोरोना संकटाने संपूर्ण जगाला ग्रासले. श्रीलंकच्या पर्यटनावर त्याचा परिणाम झाला. पर्यटन व्यवसाय पूर्णत: ठप्प झाला. श्रीलंकेच्या जीडीपीमध्ये जवळपास 12 टक्के हिस्सा पर्यटनाचा आहे. शिवाय, व्यवसायानिमित्त परदेशात गेलेल्या श्रीलंकन नागरिकांपैकी सुमारे 70 टक्के नागरिक याच काळात मायदेशी परत आले. आतापर्यंत त्यांना विदेशात मिळणाऱ्या उत्पन्नाच्या रुपाने परकीय चलन गंगाजळीत भर टाकत होते. त्यामुळे हा स्रोतही बंद झाला. त्याशिवाय श्रीलंकेत आर्थिक आणीबाणी निर्माण होण्यास इतरही काही कारणे आहेत.

भारत आणि चीनकडून श्रीलंकेला मदत अपेक्षित आहे. अन्यथा तिथे उपासमार वाढेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. भारताने तत्परतेने मदतीचा हात पुढे केला आहे. पण चीनने मदत म्हणून कर्ज देऊ करताना धूर्तपणा दाखवला आहे. चीनचा धूर्तपणा काय आहे, पाहा –

 

Bharat Shakti Marathi या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा.
https://youtube.com/channel/UCPZPza3BQr6nt1Tp8EntiGg

 

(शब्दांकन : मनोज शरद)